BNR-HDR-TOP-Mobile

Ambegaon : विहिरीचे खोलीकरण सुरु असताना मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील घटना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यात विहिरीचे खोलीकरण सुरु असताना ढिगा-याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना काल, गुरुवारी (दि. 18) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हारवाडी, गणेशनगर ता. आंबेगाव येथे घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. 12तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा उपसण्यात आला. मात्र या मजुराचे प्राण वाचवण्यात अपयश आले.

HB_POST_END_FTR-A4

.