HB_TOPHP_A_

Ambegaon : कळंब येथे तीन बिबट्यांपैकी एक बिबटया जेरबंद

145

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यातील कळंब (धरणमळा ) येथे काल बिबट्याने पाच शेळ्या ठार केल्या होत्या. त्याच ठिकाणी काल रात्री एकच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला असून अजून दोन बिबटे वास्तव्यास आहेत.

HB_POST_INPOST_R_A

कळंब येथील धरणमळा परिसरात गेले महिनाभर तीन बिबट्यानी धुमाकूळ घातला असून या परिसरातील अनेक शेळ्या, गायी, कुत्र्यावर हल्ला करून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. काल, बुधवारी (दि 16) मारुती उर्फ बाबूनाथ कहडने यांच्या 5 शेळ्या बिबट्यानी हल्ला करून मारल्या होत्या

वनविभागाने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून ठेवला. रात्री एकच्या सुमारास दीड ते दोन वर्षाचा बिबट्या या पिजऱ्यात जेरबंद झाला. तर त्या पिंजऱ्याजवळ आणखी दोन बिबटे रात्रभर बसून असल्याचे सुनीता कहडणे यांनी पाहिले.

आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी या बिबट्यास ताब्यात घेऊन त्याची माणिकडोह (ता जुन्नर) येथील बिबटया निवारण केंद्रात रवानगी केली आहे. अजून दोन बिबटे असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: