Ashadhi Wari : वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेला रुग्णवाहिका हजर

एमपीसी न्यूज : दोन वर्षाच्या कोव्हिड कालखंडानंतर (Ashadhi Wari) सुरु झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी आलेल्या वारकरी मंडळींच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी निगडी प्राधिकरण येथील संत तुकाराम उद्यान येथून या वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 जून रोजी वैद्यकीय पथक, डॉक्टर व रुग्णवाहिका पाठवण्यात आली. गेली 29 वर्षे अनाथाश्रम, आश्रम शाळा,आदीवासी भाग, वारकरी भक्त यांची सेवा वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट करत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचक ईप्पर पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते रुग्णवाहिका व औषध वाहतूक करणाऱ्या ट्रकला हार घालून, श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्या वेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमहापौर शैलजा मोरे, संतोष खिंवसरा, अध्यक्ष पिंपरी चिंचवड ड्रगीस्ट आणि फार्मीस्ट असोसिएशन, महावीर मित्तल, महाराष्ट्र पेंट्स, जगराम चौधरी, विश्वस्त श्रीराम नलावडे, डॉ. वसंतराव गोरडे, प्रकाश सातव, मिलिंद देशमुख, भाऊ ठोंबरे, भीमजी विधाते, डॉ. रामनाथ बच्छाव उपस्थित होते.

MPC News Event : ऐतिहासिक चित्रपट आवडणाऱ्या रसिकांसाठी आज पर्वणी

त्या वेळेस ‘खरा वैष्णव वारी’ विशेषांकाचे (Ashadhi Wari) उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन व आयोजन पुणे वारी व्यवस्थापन प्रमुख मुकेश सोमैय्या यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.