Snooker Championship : अमी कमानी, पियुष खुशवाह, पडू रंगघाईया, सुमेर मागो, तहा खान, सुमित अहुजा, विशाल राजानी विजयी

एमपीसी न्यूज – द क्यु क्लबतर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अमी कमानी, पियुष खुशवाह, पडू रंगघाईया, सुमेर मागो, तहा खान, सुमित अहुजा आणि विशाल राजानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून गटसाखळी फेरीत आपले (Snooker Championship) गुणांचे खाते उघडले.

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या गटसाखळी फेरीत अमी कमानी याने राफत हबीब याचा 72-10, 52 – 56, 85 – 47, 46 – 72, 80-25 असा संघर्षपूर्ण पराभव केला. फ गटामध्ये विशाल राजानी याने आशुतोष पाध्ये याचा 78 – 32, 33 – 78, 17 – 66, 77- 53, 61-22 असा चुरशीच्या लढतीमध्ये पराभव करून गुणांचे खाते उघडले. ह गटाच्या सामन्यात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या तहा खान याने धवल गधवी याचा 43 – 55, 50-20, 34 – 62, 76 – 05, 56 – 32 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

 

 

क गटाच्या सामन्यात पियुष खुशवाह याने अभिषेक बजाज याचा 48 – 59, 55 – 37, 40 – 57, 73 – 24, 68 -12 असा पराभव केला.याच गटामध्ये पडू रंगघाईया याने जयेश साळवी याचा 61 – 13, 13 – 58, 12 – 50, 68 – 47, 63 – 38 असा संघर्षपूर्ण पराभव केला. ई गटाच्या सामन्यात सुमेर मागो याने के. वैंकटेश याचा 59 – 44, 48 – 49, 81 – 02, 64 – 12 असा पराभव केला. ज गटामध्ये सुमित अहुजा याने एमडी अली हसन याचा 63 – 50, 60 – 05, 02 – 76 (49), 59 – 33 असा पराभव करून आगेकूच केली.

सामन्यांचे निकालः मुख्य ड्रॉः गटसाखळी फेरीः

गट फः अमी कमानी वि.वि. राफत हबीब 72 -10, 52 – 56, 85 – 47, 46 – 72, 80 -25;

गट फः विशाल राजानी वि.वि. आशुतोष पाध्ये 78 – 32, 33 – 78, 17- 66, 77 – 53, 61-22;

गट कः पियुष खुशवाह वि.वि. अभिषेक बजाज 48 – 59, 55 – 37, 40 – 57, 73 – 24, 68 – 12;

गट कः पडू रंगघाईया वि.वि. जयेश साळवी 61- 13, 13 – 58, 12- 50, 68 – 47, 63 – 38;

गट ईः सुमेर मागो वि.वि. के. वैंकटेश 59 – 44, 48 – 49, 81- 02, 64 – 12;

गट हः तहा खान वि.वि. धवल गधवी 43 – 55, 50 – 20, 34 – 62, 76 – 05, 56 – 32;

गट जः सुमित अहुजा वि.वि. एमडी अली हसन 63 – 50, 60 – 05, 02 – 76 (49), 59 -33;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.