Vadgaon News : युवा संसद स्पर्धेचे बेस्ट ज्युरी अमीन खान सन्मानित

एमपीसी न्यूज : भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या युवा संसद स्पर्धेच्या राज्यस्तरीय ज्युरी कमिटीत उत्कृष्ट ज्युरी म्हणून काम केल्याबद्दल पत्रकार अमीन खान यांना सन्मानित करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी शुक्रवारी (26 मार्च) पुरस्काराच्या रकमेचा धनादेश खान यांना सुपूर्त केला.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स संस्थेच्या सभागृहात नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालयातर्फे जानेवारीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय युवा संसद अभियानातंर्गत युवा वक्तृत्व स्पर्धेच्या ज्युरी पॅनलवर पत्रकार प्रतिनिधी ज्युरी म्हणून अमीन खान यांनी केलेल्या कामाची दखल संयोजन समितीने घेतली.

त्यानुसार प्रमाणपत्र आणि धनादेश त्यांना सुपूर्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संसदेच्या सेंन्ट्रल हॉल मध्ये राष्ट्रीय युवा संसद संपन्न झाली.

*चौकट:  तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत या पुरस्काराबद्दल अमीन खान यांचा सत्कार आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बडवे इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, उद्योजक संदीप घारे, पतसंस्थेच्या अध्यक्षा अर्चना घारे, सुमित्रा दौंडकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.