Amir Khan News : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

एमपीसी न्यूज – बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानची ओळख आहे. आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानत आमिरनं ही त्याची अखेरची पोस्ट असल्याचं स्पष्ट केलं. आमिरनं ही पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्राम दोन्ही ठिकाणी शेअर केली आहे.

आमिरनं त्याच्या नोटमध्ये लिहिलं, ‘नमस्कार मित्रांनो, माझ्या वाढदिवसाला तुमचं सर्वांचं एवढं प्रेम पाहून माझं मन भरून आलं. यासाठी तुमचे सर्वांचे खूप आभार. ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे. मी निर्णय घेतला आहे की मी माझं सोशल मीडिया बंद करणार आहे. पण आपण एकमेकांच्या संपर्कात राहू जसे आतापर्यंत होतो.’

यासोबतच आमिरनं त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिशिअल सोशल मीडिया हॅन्डलची माहितीसुद्धा दिली आहे. ज्यावर चाहते त्याला फॉलो करू शकतात. या सोशल मीडिया हॅन्डलवरून आमिरच्या आगामी चित्रपटांबद्दल सर्व अपडेट दिल्या जाणार आहेत.

यानंतर आमिर त्याच्या पर्सनल सोशल मीडिया हॅन्डवर सक्रिय असणार नाही मात्र त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हॅन्डवरून तो चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे.

आमिरनं त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘आमिर खान प्रोडक्शननं आपलं अधिकृत सोशल मीडिया अकाउंट तयार केलं आहे. ज्यावर माझे आणि माझ्या आगामी चित्रपटांचे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.