BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखाचे पॅकेज

विपुल कदम याला कॅपजेमिनी कंपनीकडून १८ लाखाचे पॅकेज

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत ७० लाख वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी विपुल कदम याला मलेशिया येथे कॅपजेमिनी कंपनीत १८ लाखाचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण, विभागप्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी मेहनत घेतली आहे.

संगणक अभियंता असलेल्या अमरजित याने ट्रिनिटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. केजे शिक्षण संस्थेने अमरजित याला ‘जीआरई’ व ‘टोफेल’ या परीक्षांची तयारी करण्यासाठी, तसेच अमेरिकेत मास्टर इन कम्प्युटर सायन्स (एमएस) करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य पुरवले होते. विपुलने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. सुहास खोत यांनी दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले

HB_POST_END_FTR-A1
.