Amit Shah Gets Discharged: गृहमंत्री अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज

त्यांच्यावर गुरुग्राम येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- गृहमंत्री अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे ही झाले होते. त्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते. आता ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. एम्सने रविवारी एक निवेदन जारी करुन लवकरच अमित शहा यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे जाहीर केले होते.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांनी टि्वटरवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर गुरुग्राम येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली होती.

त्यानंतर थकवा आणि अंग दुखीच्या तक्रारीनंतर त्यांना पुन्हा 18 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनानंतरच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.