रविवार, सप्टेंबर 25, 2022

Amit Thackeray : पक्षबांधणीसाठी अमित ठाकरे मैदानात; 12 पासून पुणे दौरा

एमपीसी न्यूज – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून पक्ष उभारणीसाठी सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुध्दा पक्षबांधणीसाठी मैदानात उतरणार आहेत.

अमित ठाकरे तीन दिवसांचा पुणे दौरा करणार आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्र यांचा दौरा केल्यानंतर ते आता पुणे दौरा करणार आहेत.अमित ठाकरे 12,13,14 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

यावेळी ते महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधणार आहेत.त्यातून विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.तसेच अमित ठाकरे सगळ्या मतदार संघात जाऊन पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत.

अमित ठाकरे पुण्यातील 8 आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील 5 विधानसभा मतदार संघात जाऊन पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत. 12 ऑगस्टला अमित ठाकरे कोथरुड,खडकवासला, भोर,वेल्हा, मुळशी,शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा करणार आहेत. 13 रोजी पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदार संघात आणि 14 तारखेला शिरुर, चाकण आणि खेडमध्ये दौरा करणार आहेत.

spot_img
Latest news
Related news