Amitabh Bachchan: ‘बिग-बीं’नी मानले चाहत्यांचे हृदयपूर्वक आभार!

Amitabh Bachchan: 'Big-B' thanked fans!

एमपीसी न्यूज – मुंबईच्या नानावटी रुग्णालात कोरोनावरील उपचार घेत असलेले भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देणाऱ्या व प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आज (रविवारी) रात्री ट्वीट करून हृदपूर्वक आभार मानले.

बिग बी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या व माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देणे शक्य नाही. आपण आमच्याविषयी काळजी व्यक्त केलीत. त्यासाठी मी दोन्ही हात जोडून म्हणेन… आपले अंतरिक प्रेम आणि आत्मीयतेसाठी धन्यवाद!

ऐश्वर्या आणि आराध्याचे सेल्फ आयसोलेशन 

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या या दोघी घरामध्येच सेल्फ क्वारंटाईन झाल्या आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे. जया बच्चन यांच्यासह उर्वरित सर्व कुटुंबीयांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. बच्चन परिवाराविषयी सदिच्छा आणि प्रार्थना करणाऱ्यांचे अभिषेक बच्चन याने आभार मानले आहेत.

 

डॉक्टरांचा निर्णय होईपर्यंत आपण आणि आपले वडील दोघेही हॉस्पिटलमध्येच राहणार आहोत, असे अभिषेक बच्चन यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे. आपण सर्वांनीही सतर्क राहावे आणि सुरक्षित राहावे तसेच सर्व नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहनही त्याने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like