गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Amol Awate: पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा रविवारी सत्कार

एमपीसी न्यूज: 22 वर्षांच्या लष्कराच्या सेवेनंतर पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल शांताराम आवटे यांचा सत्कार रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज आणि आवटे कुटुंबीय यांच्यावतीने हा सोहळा पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह ( घोले रस्ता ) येथे 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.(Amol Awate) माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार होणार आहे.

Pimple Saudagar News: पेपर वाटणाऱ्या सुजितला शिक्षणासाठी नाना काटे यांच्याकडून सायकल, स्कूल बॅग भेट

गंगोत्री होम्स अॅण्ड हॉलिडेजचे संचालक राजेंद्र आवटे यांनी  पत्रकाद्वारे  ही माहिती दिली. आंबेगाव तालुक्यातील,आवटे कुटुंबातील सदस्य अमोल शांताराम आवटे (Amol Awate) यांनी सेनादलामध्ये 22 वर्षांची अभिमानास्पद सेवा  बजावल्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेची स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आय ए एस (IAS) अधिकारी होण्याचा  बहुमान मिळविला आहे. 29 ऑगस्टपासून ते प्रशिक्षणासाठी मसुरीला जाणार आहेत.

 

 

Latest news
Related news