Marunji : अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – मारुंजी येथे गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे कुस्ती अकँडमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि गुजरात संघात निवड झाली आहे. येत्या २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान चित्तोडगढ येथे या राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त विक्रम पारखी याची ९६ किलो वजनी गटातून फ्री स्टाईल कुस्ती प्रकारासाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तर कपील पाटील याची ७४ किलो वजनी गटातून ग्रीकरोमन प्रकारात गुजरात संघात निवड झाली आहे. या मल्लांना प्रा. किसन बुचडे, धोंडिबा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले तर महेश घुले, तुषार कदम, उमेश कुमार यांनी प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1