Chinchwad : काळभोरनगर येथील स्वादोत्सव रेस्टॉरंटमध्ये आमरस फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज- मे महिना म्हटला म्हणजे आंब्यांचा घमघमाट, मोग-याचा मत्त गंध, कोकिळेचे कूजन, गारेगार आईस्क्रिम, घरातली पाहुण्यांची गर्दी, त्यांच्याबरोबर केलेली भटकंती अशा काही गोष्टी आठवणे अपरिहार्य असते. फळांचा राजा असे ज्याला म्हटले जाते त्या आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे दिवस आता आले आहेत. बाजारात आंब्याची मोठी आवक झाली आहे. मग मित्रमंडळी, नातेवाईंकांसोबत आंब्याच्या रसावर मस्त ताव मारायचा असेल तर काळभोरनगर, चिंचवड येथील स्वादोत्सव रेस्टॉरंटला भेट द्यायलाच हवी. आधीच्या मनभावन रेस्टॉरंटच्या जागी आता स्वादोत्सव रेस्टॉरंट सुरु झाले असून येथे गुजराती आणि राजस्थानी थाळी यांचे मिश्रण असलेली थाळी मिळते. तसेच उन्हाळ्याच्यानिमित्ताने खास आमरस देखील येथे उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या येथे आमरस महोत्सव सुरु असून त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल तर स्वादोत्सव रेस्टॉरंट गाठायलाच हवे.

आजकाल सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत वैविध्य हवे असते. कोणत्याही एकाच प्रकारच्या पद्धतीत अडकून पडायला आवडत नाही. खाण्याच्या बाबतीत सुद्धा हेच. आणि म्हणूनच हेल्थ कॉन्शस तरुणाईला खाण्यापिण्यात देखील वैविध्य हवे असते, त्यांचा वेगवेगळा चॉईस हवा असतो. त्याशिवाय हे सगळे खाद्यपदार्थ रुचकर आणि कमी कॅलरीचे देखील हवेत. बरं या खाण्याच्या पद्धतीदेखील खूप वेगवेगळ्या असतात. खाद्यपदार्थ जास्त तेलकट नकोत, चविष्ट हवेत, हेवी देखील नकोत. मग या सगळ्या गोष्टी सांभाळून पाककृती हव्या त्यादेखील चटपटीत त्याचबरोबर पोट भरणा-या आणि सर्वसमावेशक. म्हणजे त्यात स्टार्टर्स हवेत, भाज्या, सलाड, चटणी, फुलका, पराठा आणि स्वीटदेखील हवे.

नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन फक्त तरुणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांना आवडेल अशी सर्वसमावेशक थाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे काळभोरनगर, चिंचवड येथील स्वादोत्सव रेस्टॉरंट. येथे गुजराती आणि राजस्थानी थाळी यांचे मिश्रण असलेली थाळी मिळते. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथे अगदी रस्त्यावर असणा-या स्वादोत्सव या रेस्टॉरंटचा लूक आपल्याला अगदी हवेलीत घेऊन जातो. चमकदार रंगीबेरंगी खिडक्यांची तावदाने राजस्थानातील हवेलीमधील खिडक्यांची आठवण करुन देतात.

एकंदरीने अॅम्बियान्स आवडून जातो. त्यातच वेटर समोर आणून ठेवतात भरपूर वाट्या असलेली थाळी. वेलकम ड्रिंकने आपण जेवणाची सुरुवात करतो. मग ताटात येते ते स्नॅक्समध्ये मूगदाळ कचोरी, संगम ढोकळा, सोयाबीन पकोडा, डाळढोकळी, मसाला ढोकळा यापैकी कोणतेतरी दोन पदार्थ. नंतर सब्जीमध्ये खास सुरती उंधियो, राजस्थानी गवार, राजस्थानी गट्टा, पनीर हंडी, पनीर बटर मसाला, पनीर लसुणीया, जैसलमेरी चणा, देसी चणा, बैंगन भरता यापैकी कोणत्याही भाज्या त्यादिवशी जसा मेन्यू असेल त्याप्रमाणे आपल्याला मिळते. शिवाय दाल राइस, गुजराती कढी खिचडी, तडका दाल, राजस्थानी खिचडी येथे आपल्यासाठी तयार असते.

स्वीटचे तर खूपच वैविध्य आहे. स्पेशल सीताफळ रबडी, ड्रायफ्रूट बासुंदी, मॅंगो हलवा, अॅपल रबडी, केसरी हलवा, कोकोनट हलवा, मोदक, ड्रायफ्रूट जिलबी एवढी गोडाची फौज सज्ज आहे. नुसती नावे वाचूनच तोंडाला पाणी सुटले ना? येथील स्पेशालिटी काय असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर त्याची देखील मोठी यादी आहे. दही वडा, खांडवी म्हणजे सुरळी वडी, दालबाटी, सीताफळ रबडी, सुरती उंधियो, गट्टे की सब्जी अशा एकापेक्षा एक खमंग आणि चटकदार डिशेस येथे येऊन ट्राय करायलाच हव्यात. तसेच सध्या आमरस महोत्सवानिमित्त मनसोक्त आमरसावर देखील तुम्ही ताव मारु शकता.

सध्या येथे रेग्युलर थाळी 280 रुपयात अमर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. मुलांसाठी थाळीचा दर 200 रुपये आहे. तसेच मंगळवारी नेहमीच्या रेटपेक्षा थोडी सूट म्हणजे 230 रुपयांची थाळी उपलब्ध आहे. मुलांच्या थाळीचा दर 200 रुपये आहे. तसेच किटी पार्टी, बर्थ डे पार्टी, फॅमिली गेटटुगेदर, साठीशांत यासारख्या आपल्याकडे असणा-या घरगुती समारंभासाठीदेखील येथे सुमारे साठ ते सत्तर लोकांसाठी मस्त जेवणाची सोय होते. आऊटडोअर केटरिंगची देखील येथे व्यवस्था आहे. स्वादोत्सव रेस्टॉरंट दुपारी बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु असते.

तसेच येथे सकाळी अनलिमिटेड ब्रेकफास्ट देखील नव्याने सुरु करण्यात आला आहे. या अनलिमिटेड ब्रेकफास्टमध्ये पोहा, साबुदाणा खिचडी, मिसळ पाव, समोसा, फापडा, जिलबी, इडली सांबार, मेदूवडा, मूगभेळ, चहा, हॉटमिल्क, ब्रेड बटर जॅम, केक हे पदार्थ मिळणार आहेत. फक्त 110 रुपयांमध्ये या सर्व डिशचा आपण आस्वाद घेऊ शकता. सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळात येथे अनलिमिटेड ब्रेकफास्ट उपलब्ध आहे.

पार्सल आणि टेबल बुकींगसाठी संपर्क करा –
स्वादोत्सव – 99757 92865, 74100 12865

पत्ता – स्वादोत्सव, 5, जेम्स क्रिस्टल, स्टार बजार जवळ,
नेक्स्ट टू पॅन्टलून्स, काळभोरनगर, जुना पुणे – मुंबई महामार्ग,
चिंचवड.

(आपल्या हॉटेलची खासियत, आयोजित केलेले विविध फूड फेस्टिव्हल, खास पदार्थ याबाबतची माहिती आमच्या एमपीसी न्यूज खाऊअड्डा वर द्यावयाची असल्यास 9011050005 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा )

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like