Pune : तो स्वतःच्या घरासाठी काम करणारा नसावा : अमृता फडणवीस

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला

एमपीसी न्यूज-जो माणूस महाराष्ट्राच्या ( Pune) प्रगतीसाठी बरोबर आहे.तो मुख्यमंत्री व्हावा. त्याबाबत प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे.तो प्रगतीसाठी काम करणारा आहे का ? तो स्वतः च्या घरासाठी काम करणारा नसावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात मांडत ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच मला कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आवडेल, पण त्याने नीट काम करावे ,अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Pune : उलगडला गेमिंगचा इतिहास…

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आल्या होत्या.त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलवून दाखविली आहे.तसेच लवकरच भाजप सोबत देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आपणास आवडेल का ? त्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी ( Pune) भूमिका मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.