Vadgaon Maval : राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अमृता लुणावत यांची निवड

एमपीसी न्यूज : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लोणावळा येथील अमृता निखील लुणावत ( सुराणा ) यांची निवड करण्यात आली आहे. 

आमदार सुनिल शेळके, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, रूपाली दाभाडे, शैलेजा काळोखे, सुनीता काळोखे, मंजुश्री वाघ, विणा करंडे, मोनिका बेंजामिन आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

तालुक्यात महिला संघटना बळकट करून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमृता लुणावत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.