Pimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती

औद्योगिक न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर उपनिबंधक, श्रमिक संघ, पुणे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबर चिंचवडे यांनी महासंघाच्या कामकाजाबद्दल न्यायालयात केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती अंबर चिंचवडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेत सहा हजार पेक्षा अधिक सभासद आहेत. अंबर चिंचवडे यांनी 2018-2019 या कालावधीत महासंघाचे खजिनदार म्हणून काम पाहिले. काम करत असताना त्यांनी महासंघाच्या कामगार हिताच्या विरोधात काही गोष्टींना विरोध केला. त्यामुळे महासंघाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिका-यांनी चिंचवडे यांना खजिनदार पदावर नियमबाह्यपणे काढले. महासंघाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी जून 2018 मध्ये कामगार आयुक्तांकडे धाव घेतली.

कामगार आयुक्तांसमोर याप्रकरणाची वेळोवेळी सुनावणी झाली. महासंघाचे काम नियमबाह्य अंडी बेकायदेशीर असल्याची कामगार आयुक्तांची खात्री पटल्याने त्यांनी एप्रिल 2019 मध्ये हा वाद औद्योगिक न्यायालयात उपस्थित करण्यास संमती दिली. चिंचवडे यांच्या बाजूने अॅड. संतोष म्हस्के यांनी बाजू मांडली. मे 2019 मध्ये दावा औद्योगिक न्यायालयात दाखल करण्यात आला. चिंचवडे यांनी या प्रकरणात आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करत  कर्मचारी महासंघावर संघटनेचे कामकाज करण्यास मनाई करुन संघटनेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याचा निर्बंध घालण्याचा अंतरिम निर्णय दिला.

दाव्याची वेळोवेळी सुनावणी होऊन दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुणे औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांनी 18 जुलै रोजी अंतिम आदेश दिला. त्यामध्ये कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन पुणे श्रमिक संघाचे उपनिबंधक यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. तसेच आदेशामध्ये संघटनेचा संपूर्ण ताबा व सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यात सभासदांची यादी तयार करावी व संघटनेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. याबाबतचा चौकशी अहवाल औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.

औद्योगिक न्यायालायने दिलेल्या निर्णयाबाबत कर्मचारी महासंघाचे मधुकर रणपिसे, संभाजी पार्टे, बाळासाहेब कापसे, विलास नखाते, दिलीप काटे, मिलींद काटे, नारायण वाघेरे, संदेश नढे, गिरीष सलगरकर, अविनाश ढमाले, बाबु चिंचवडे, सुभाष लांडे, धनाजी नखाते, हेमंत जाधव, राजेश चव्हाण, राजेद्र वाघेरे, राजेंद्र वाघमारे, राम येवले, हेमंत पिंजन, मंगेश कोंढाळकर, नरेंद्र दुराफे, विवेक शिर्के, अविनाश तिकोने, सुनिल कलापुरे, राजेश बांदल, योगेश रसाळ, प्रदीप टकले, अक्षय टोके, राजु केंगार, योगेश वंजारे, सुधाकर मोहिते, किरण सौदा, नारायण धोञे, प्रभाकर तावरे, आकाश बनसोडे, नितीन ठाकर, अमित जाधव, अनिल राऊत, रणजीत भोसले, संदीप गव्हाणे, अविनाश वाघेरे, गणेश लांडे, संजय लांडगे, विजेंद्र आठवाल, निलेश घुले, उमेश साठे, प्रमोद गवळी, नवनाथ शिंदे, सत्यवान वाळके, बाळासाहेब साठे, लक्ष्मण बंडगर, रविंद्र काळे, पलाश देवकर, बाप्पु गायकवाड, गोरख भालेकर, धनंजय भालके, सागर भंडारे, धनंजय थोरवे, देवा आसवले, कल्पेश कापसे, पंकज गावडे, तुषार काळभोर, सुरेश माने, महादेव साबळे, सतिश कांबळे, विनोद कुसाळकर, अनिल गायकवाड, बाळासाहेब मालुसरे, नाना मिसाळ, विजय नलावडे, मयुर खराडे, कृष्णा पारघे, रविंद वाघेरे, रविंद्र वाळुंजकर, राजु अपार, सुनिल झेडे, विकास कुदळे, ज्ञानेश्वर काळभोर, निलेश जाधव यांच्यासह अनेकांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.