Chikhali : कारला समोरून धडक देणा-या मद्यपी रिक्षाचालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मद्यपान करून रिक्षा चालवत असताना रिक्षाने रस्त्यावर एका कारला समोरून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मद्यपी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 31) सकाळी पावणेनऊच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे झाला.

राजकलप्पा पवार (वय 31, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक सर्जेराव सरोदे (वय 27, रा. संजय गांधीनगर, काळेवाडी) या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार त्यांची कार पार्क करण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी सरोदे हा रिक्षा वेडीवाकडी चालवत आला. त्यामुळे फिर्यादी पवार यांनी त्यांची कार रस्त्याच्या मधोमध थांबविली. त्यानंतर आरोपी सरोदे याच्या रिक्षाने या कारला धडक दिली. यात कारच्या समोरच्या बाजूच्या बोनेटचे नुकसान झाले. आरोपी रिक्षाचालक सरोदे याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.