Talegaon : कलाकाराला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय पण मिळणे आवश्यक आहे – प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा १८ वा  वर्धापनदिन दिमाखात

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा १८ वा वर्धापनदिन बुधवार दिनांक ३१ मे २०२३  रोजी संपन्न झाला. त्यावेळी सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ‘कलाकाराला लोकाश्रया बरोबरच राजाश्रय पण मिळणे आवश्यक आहे’, असे मनोगत व्यक्त केले.

Dighi : आरडाओरडा करून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल

सुप्रसिद्ध सिनेनाट्य आणि मालिका कलाकार मिलिंद गवळी (आई कुठे काय करते फेम) व सिनेनाट्य आणि मालिका कलाकार  रुपाली भोसले (आई कुठे काय करते फेम) यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर ओव्हाळ तसेच मधमाशी पालन क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवणारे विजय महाजन, कलापिनीची युवा कलाकार सायली रौंधळ (नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी), अविनाश नांगरे (चिमणी संवर्धन आणि पालन), नयना डोळस (दिव्यांग मुलांच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुख्य प्रशिक्षक) या सर्वांचा विशेष गौरव सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचे हस्ते करण्यात आला  समारंभासाठी सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, विजय गोखले, सविता मालपेकर, गार्गी फुले हे सर्व सिने नाट्य क्षेत्रातील तसेच बबनराव भेगडे (संचालक पुना पीपल्स साकारी बँक ) व साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा आरंभी सामाजिक कार्यकर्ते – कै.किशोर भाऊ आवारे, माजी नगराध्यक्ष – कै.विश्वनाथराव दाभाडे, माजी नगराध्यक्ष – कै.सुरेशभाई शहा, नाट्यपरिषद तळेगाव शाखा कलाकार कै.विद्याधर पुराणिक,नाट्यपरिषद तळेगाव शाखा आजीव सदस्य – कै.घननीळ देशपांडे सुप्रसिद्ध सिने, नाट्य कलाकार कै.विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले व संगीता सुधीर राऊत यांनी सदर केलेल्या ओडिसी नृत्य प्रकारातील गणेश वंदना सदर केली.

कलागौरव पुरस्काराला उत्तर देताना रुपाली भोसले म्हणाल्या माझी रंगमंचावरची कारकीर्द नाट्य संमेलनातील कार्यकर्ती म्हणून झाली. सिनेमा आणि मालिकातून काम करताना आधी नाटकात काम किती महत्वाचे आहे ते कळते.

ज्या गावात कलाकार राहतात,कलेला प्रोत्साहन मिळते तिथली माणसे खूप सुखी असतात असे मिलिंद गवळी यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतात सांगितले. राजन भिसे यांनी चित्रफिती द्वारा तळेगावातील नियोजित नाट्यगृहा विषयी माहिती दिली.

हे नाट्यगृहा लवकरात लवकर प्रत्यक्षात आणून तळेगावकर रसिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोगत अ.भा.मराठी नाट्यपरिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले व त्यासाठी अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मदत करावी असे ही सांगितले.

विशेष गौरवार्थीच्या वतीने बोलताना प्रभाकर ओव्हाळ यांनी विशेष गौरवार्थींच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन केलेल्या गौरवा बद्दल अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे उत्तम आणि नेटके सूत्रसंचालन तळेगावच्या प्रथित यश निवेदिका डॉ.विनया केसकर यांनी केले. डिजिटल डिस्प्ले व्यवस्था विवेक क्षीरसागर यांची होती. विशेष गौरवार्थी अविनाश नागरे यांनी सर्व अतिथींना चिमण्यांची घरटी भेट दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अ.भा.म.नाट्यपरिषद मावळ शाखेच्या तानाजी मराठे, राजेश बारणे, डॉ.मिलिंद निकम,नितीन शहा, अमित बांदल, गोपाळ परदेशी, कैलास केदारी, संग्राम जगताप, तेजस धोत्रे, क्षिप्रसाधन भरड, पूजा डोळस, प्रसाद मुंगी, सुरेश दाभाडे, अनिल धर्माधिकारी, डॉ.यशवंत वाघमारे, संजय वाडेकर, संजय चव्हाण, हरिश्चंद्र गडसिंग व विश्वास देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.