Alandi : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – चारित्र्याच्या संशयावरून पतीने लोखंडी पाईप डोक्यात मारून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ घडली.

_MPC_DIR_MPU_II

रेणूका मच्छिंद्रनाथ जोगी (वय 26, रा. ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ, आळंदी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. तिचा पती मच्छिंद्रनाथ उत्तमराव जोगी (वय 26) याला आळंदी पोलीसांनी गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मच्छिंद्रनाथ आणि पत्नी रेणुका यांच्यात मध्यरात्री दोन वाजता वाद झाला. ’तु एका व्यक्तीशी का बोलतेस, तो घरी का येतो, अशी विचारणा करत पत्नी रेणुकाच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारले. रेणूका पतीला प्रतिकार करत असताना तिच्या हात आणि बोटावरही मार बसला. तिने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणा-या सचीन कदम यांनी घरात येऊन रेणूकाची पतीपासून सुटका केली. रेणूकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आळंदी ठाण्याचे फौजदार चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.