BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लष्कर परिसरात भरदिवसा कोयता गँगकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पुण्यातील लष्कर परिसरात भर दिवसा कोयता गँगकडून दहशत पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

आदित्य उर्फ मन्या भोसले (वय 28, रा. भवानी पेठ, पुणे), सुशील भडकवाल (वय 27, रा. भवानी पेठ, पुणे), संतोष उर्फ बाळा गायकवाड (वय 35, रा. मोदीखाना कॅम्प, पुणे), डेनलील डिक्रूज जोन्स (वय 35, रा. भवानी पेठ, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लष्कर परिसरात भर दिवसा हातात कोयता घेऊन आरोपींनी व्यावसायिकांना महिन्याला हफ्ता देण्याची मागणी करून दुकानांची तोडफोड केली. येथील एका वाईनच्या दुकानाच्या काचेवर कोयत्याने मारून हफ्ता चालू न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आदित्य व सुशील यांनी कोयता हातात घेऊन फिर्यादींच्या गळ्याजवळून भिरकावत दोन लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सिमेंटचे ब्लॉक दुकानातील रॅकवर मारून फिर्यादी यांचे एक लाख 10 हजार रुपयांचे नुकसान केले.

तर शेजारील दुकानांच्याही काचा फोडल्या. तर एका एंटरप्रायजेसच्या दुकान मालक तुकाराम यांच्यावर कोयता उगारून एका इसमाचा मॅटर क्लोज कर अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत तुकाराम यांना डोक्यात व पोटात हाताने मारहाण केली.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत चौघांना अटक केली. मात्र या प्रकरारामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2