Nigdi : कर्ज दिल्यानंतर व्याजापोटी अवाच्या सवा रक्कम मागणा-या खाजगी सावकारावर गुन्हा

An case filed against a private lender who asks for a quarter of the interest on a loan.

एमपीसी न्यूज – आठ लाख रुपये कर्ज दिले. कर्जदाराने कर्जाची रक्कम आणि व्याजापोटी तीन लाख रुपये असे एकूण 11 लाख रुपये दिले. तरीही कर्जदाराकडून तब्बल 45 लाखांची मागणी करणा-या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 जुलै 2019 पासून 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.

नाजीर काजी (वय अंदाजे 50, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामसिंग हरिसिंग रायजी (वय 48, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 20) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काजी याच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना देखील तो सावकारी करतो. त्याने फिर्यादी यांना जुलै ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत तीन टप्प्यात आठ लाख रुपये दिले होते. त्यावर दोन टक्के व्याजदर आकारण्याचे ठरले होते.

_MPC_DIR_MPU_II

फिर्यादी रायजी यांनी जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत कर्जाचे 8 लाख रुपये आणि तीन लाख रुपये व्याज असे एकूण 11 लाख रुपये काजी याला दिले. तरीही काजी याने अधिकाधिक व्याजाची मागणी करून पैसे देण्यासाठी तगादा लावला.

फिर्यादी आणि त्यांच्या परिवाराला काजी याने धाक दाखवला. वेळीअवेळी फिर्यादी यांच्या कपड्याच्या दुकानावर चार ते पाच व्यक्तींसोबत जाऊन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 45 लाख रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 143, 387, 506 (2), 504, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.