Nigdi News : अमरधाम स्मशानभूमीत पर्यावरणपूरक विद्युतदाहिनी उभारणार

एमपीसी न्यूज – निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत  पर्यावरणपूरक विद्युतदाहिनी उभारण्यात येणार आहे. तसेच स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निविदापूर्व आणि निविदापश्चात कामांसाठी प्रकल्प किमतीच्या 1.88 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

या कामाचा समावेश अंदाजपत्रकात करण्यासाठी 20 मे 2021 रोजी महापालिका सभेत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 3 ऑगस्ट 2021 रोजी  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात बैठक पार पडली.

या बैठकीत प्रभाग क्रमांक 12 आणि 13  मधील सर्व नगरसेवकांनी निगडी सेक्टर 22 येथील स्मशानभूमीत सुधारणा करण्याबाबत मागणी केली. या बैठकीत आयुक्तांनी निगडी स्मशानभूमीत आवश्यक सुधारणा व अनुषंगिक कामे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अमरधाम स्मशानभूमीत सध्या दहनासाठी 12 ठिकाणी सोय केली आहे. या ठिकाणी एक विद्युतदाहिनी उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.