Ravet : पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी तयार केली इलेक्ट्रिक दुचाकी

एमपीसी न्यूज – ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आगामी काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांचे महत्व वाढणार आहे. अल्प खर्चात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने व्यावसायिक स्तरावर भारतीय अभियंत्यांनी तयार करावीत. त्यामुळे परदेशात जाणारे कोट्यावधी रूपये भारतातच इतर विकास प्रकल्पात वापरता येतील. इलेक्ट्रिक वाहनाचे तंत्रज्ञान आता वेगाने विकसित होत आहे. त्यामध्ये नव अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा. या उद्देशाने पीसीईटी वेळोवेळी विविध कार्यशाळांचे आयोजन करीत असते. त्याअंतर्गत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेणे शक्य असेल तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आर्थिक सहाय्य पीसीईटी व तांत्रिक सहाय्य महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड करेल, असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथील विशाल बो-हाडे, ऋत्विक गोवर्धन आणि इतर विद्यार्थ्यांनी ‘‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स’’ या कार्यशाळेत इलेक्ट्रिकवर चालणारी दुचाकी तयार केली. ही इलेक्ट्रिक दुचाकी तीन तासांच्या चार्जिंगमध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने धावू शकेल. यामध्ये आणखी संशोधन केल्यास त्याचे व्यावसायिक उत्पादन घेणे शक्य आहे. पीसीईटी व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडच्या वतीने आणखी पाच डेमो मॉडेल तयार करण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेचे आयोजन पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राहूल पर्बत, प्रा. प्रियांका चव्हाण, दीपशिखा श्रीवास्तव यांनी केले होते. इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडचे इलेक्ट्रिक व्हेईकल विभाग मुख्य व्यवस्थापक शुभंकर राऊत, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.