Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार नाशिक जिल्हातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज : नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च अखेरीस होत असून या संमेलनात नाशिक जिल्हातील सर्व लेखकांच्या पुस्तकांचे एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे . नाशिक जिल्ह्याची वाङमयीन परंपरा वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी सुरु केला आहे.

त्यासाठी नाशिक जिल्हातील लेखकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती दि . १५ मार्च २०२१ पूर्वी कुसुमाग्रज नगरी , गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ . एम . एस . गोसावी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र , कॉलेज रोड , नाशिक येथे पाठवावीत , असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना . छगनराव भुजबळ , कार्याध्यक्ष हेमंत टकले , निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर , कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ , सहसमन्वयक विश्वास ठाकूर , सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी , कार्यवाह प्रा . डॉ . शंकर बो हाडे , सुभाष पाटील , भगवान हिरे , संजय करंजकर यांनी केले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.