Maharashtra Corona Update : राज्यात आज 17,864 कोरोना रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 17 हजार 864 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 लाख 32 हजार 277 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 54 हजार 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  मंगळवारी दिवसभरात 9 हजार 510 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 813 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.77 टक्के झाले आहे.

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.