Pune News : पुणे शहरात रविवारी दिवसभरात 984 रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रविवारी दिवसभरात 986 रुग्णांची वाढ झाली, तर बरे झालेल्या 750 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील 341 रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 669 झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 341 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, 682 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 5 मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 890 झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण 682 रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 96 हजार 751 झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 6 हजार 669 झाली आहे.

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण 6 हजार 743 नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत 11 लाख 92 हजार 2 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.