India Corona Update : चार दिवसांत देशात सहा लाख कोरोना रुग्णांची वाढ, 12 लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या चार दिवसांत देशात सहा लाख कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, दररोज दररोज एक ते दीड लाखांच्या दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाखांवर पोहोचली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात तब्बल 1 लाख 68 हजार 912 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 21 लाख 56 हजार 529 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 75 हजार 086 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 89.86 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 839 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 70 हजार 179 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.25 टक्के एवढा आहे‌. देशात आजवर 25 कोटी 78 लाख 6 हजार 986 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 80 हजार 136 चाचण्या रविवारी (दि.11) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

मागील पाच दिवसांपासून देशात दररोज एक ते दीड लाखांच्या दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 3.5 टक्क्यांनी वाढला आहे. दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या देखील वाढली असून दररोज 12 ते 13 लाख नमूने तपासले जात आहेत.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 10 कोटी 45 लाख 28 हजार 565 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.