Bavdhan : मोक्कातील सराईताला बावधन येथून पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज – मोक्काची (Bavdhan) कारवाई झालेल्या सराईत आरोपीला पिस्टलसह बावधन येथून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने रविवारी (दि. 16) सायंकाळी चांदणी चौक, बावधन येथे केली.
गुन्हेगार हृतिक एरंडवणे (वय 22, रा. एरंडवणे गावठाण, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक परिसरात एक सराईत गुन्हेगार येणार असून तो नेहमी स्वतःजवळ शस्त्र बाळगत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हृतिक एरंडवणे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले. हृतिक याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाचा, डेक्कन पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याचा तर उत्तमनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. तो मोक्कामध्ये मागील दीड वर्षांपासून फरार होता. हृतिक विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.