Lonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक

आंतरराष्ट्रीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

एमपीसी न्यूज : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याच्या आवारात दारासमोर गांजाची शेती करणार्‍या 15 जणांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. वाकसई, ता. मावळ येथे बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

घनवट यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, कौशल जगदीश राजपुरोहीत यांचे मालकीच्या वाकसई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर 15 मध्ये असणारा सुरावत विल्ला नावाच्या बंगल्यामध्ये विनोद सुभाषचंद्र राय (रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी एम 19, विरार बेस्ट, ठाणे) हा व त्याचे सहकारी हे कॉम्पुटर व मोबाईल सॉफ्टवेअर वरून व्हॉईसमेल पाठवून मलमइमं व गजमद या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून अमेरिकेतील लोकांची फसवणुक करून त्यातून बेकायदेशीर रित्या हवालाकरवी पैसे जमा करीत आहेत.

या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, सहा फौजदार विजय पाटील,

दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सुनिल जावळे, सुर्यकांत वाणी, प्रमोद नवले, मुकुंद अयाचित, विदयाधर निवीत, दत्तात्रय तांबे, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, पोलीस काॅन्स्टेबल बाळासाहेब खडके, प्रसन्न घाडगे, अक्षय नवले, अक्षय जावळे, दगडु विरकर यांच्या पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकत अभिनव दिपक कुमार (रा. कन्हैया भैरव रेसीडेन्सी, मीरा रोड, ठाणे),निनाद नंदलाल देवळेकर (रा. शिवसुंदर कॉम्प्लेक्स,

बदलापूर इस्ट, ठाणे, मुळगाव गुहागर, रत्नागिरी, जि. रत्नागिरी), राकेश अरुण झा (रा. इमरल्ड हाईटस् मानसरोवर, नवी मुंबई), शंतनू शाम छारी (रा. गौरवसिटी, कनाकिया, मिरा रोड, मुंबई),  दीप प्रिन्स चक्रवर्ती (रा. साई सिटी कॉम्प्लेक्स, बस डेपो जवळ, ग्रीन क्यू, बालासोपारा बेस्ट, ठाणे), निलेश बेल्जी पटेल (रा. सुर्याकुमार सोसायटी, खुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई), विनोद सुभाषचंद्र राय (रा. इव्हरशाईन ग्लोबल सिटी विरार वेस्ट, ठाणे), शाहीद शोएब खान (रा. शांतिनिकेतन कॉम्प्लेक्स. एस. के. स्टोन, मिरा भाईंदर, ठाणे), इम्तेखाब निजामुद्दीन शेख (रा. अजिमनगर मालवणी, मालाड, मुंबई 95), गौरव देवेंद्र वर्मा ( रा. कल्पतरू सोसायटी, बोरीवली,

मुंबई), बाबु राजू सिंग (रा. निरव पार्क बिल्डींग, भारती पार्क, मॅग्नॉल्डचे समोर, मिरा रोड, ईस्ट, ठाणे), विनायक धनराज उचेडर (रा. ठाकूर गाव, सिंग इस्टेट, विनायक सोसायटी, कांदीवली इस्ट, मुंबई), अभिषेक संजय सिंग (रा. साई विकास अपार्टमेंट, साईबाबा नगर, मीरा रोड, ठाणे इस्ट), मोहम्मद झमा अख्तरहुसेन मिर्झी (रा. चंद्रेश छाया लोढा कॉम्प्लेक्स, लोढा रोड, मिरा रोड इस्ट, ठाणे), शैलेश संजय उपादयाय (रा. कुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई)

यांनी जुलै 2020 ते आजपर्यंत एकत्रित संगनमताने मौजे वाकसाई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील सुरावत विल्ला नावाच्या बंगल्यामध्ये इंटरनेट व संगणक तसेच मोबाईल फोन व सॉफ्टवेअरचा उपयोग करून युनायटेट स्टेटस् ऑफ अमेरिका येथील नागरिकांचा मोबाईल फोन नंबर, नांव व इतर माहिती बेकायदेशिर रित्या प्राप्त करून संकलित करून त्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना तुमचेवर कायदेशिर कारवाई केली जाईल असा खोटा व्हाईस मेल पाठवुन त्यांना घाबरवुन गिफ्टस् कुपन आरोपींना देण्यास भाग पाडले व स्वतःची आर्थिक प्राप्ती करून घेवून फिशींग केली आहे.

तसेच वरील नमुद आरोपी कौशल जगदीश राजपुरोहीत रा. लोणावळा याचे मालकीचा व सध्या विनोद सुभाष राय रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी एम 12 विरार वेस्ट ठाणे याचे ताब्यात असणारा सुरावत विल्ला नावाचे बंगल्याच्या आवारात बेकायदा बिगर परवाना 430 ग्रॅम वजनाची व  6 हजार रुपये किंमतीची सात गांज्याची झाडे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता लागवड केली.

म्हणुन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार सुर्यकांत मारुती वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.क. 419, सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 चे कलम 66 (डी), 66, 75 प्रमाणे सह एन. डी. पी. एस. 1985 चे कलम 8 (क), 20 (ब)(ii), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर हे करत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.