Chakan News : अजस्त्र वाहतूक; कोंडीला निमंत्रण

एमपीसी न्यूज : तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम एकीकडे लालफितीत अडकून पडलेले असताना या रस्त्यावरील अजस्त्र माल वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. तब्बल दोनशे फुटांहून अधिक लांब आकाराचा अजस्त्र माल चाकण – शिक्रापूर या मार्गावरून नेताना ट्रेलर चालकांची चांगलीच कसरत होत आहे.  

उंच व अजस्त्र माल ट्रेलर मध्ये भरून नेले जात असल्याने त्यांची अत्यंत धोकादायक वाहतूक होत असून येथील वाहतूक कोंडीला आयतेच निमंत्रण मिळत आहे.

भोसरी एमआयडीसी येथून छत्तीसगड येथे निघालेल्या अशाच एका अवजड ट्रेलर वाहनामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने दिवसा रस्त्याच्या कडेला हा ट्रेलर उभा करून रात्री हा लांबलचक ट्रेलर काही अंतर मार्गक्रमण करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.