Chinchwad News : चिंचवड येथे रेल्वे गाडीखाली सापडून वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील दळवीनगर जवळ एका 55 ते 60 वर्षीय वृद्धाचा रेल्वे गाडीखाली येवून मृत्य़ू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.21) सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडला आहे.

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग, मार्गावर राबवणार विविध उपाययोजना

चिंचवड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचे वय साधारण 55 ते 60 वर्ष आहे. अंगाने मजबूत, उंची 5 फूट 6 इंच, दाढी व केस काळे-पांढरे, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट असून त्यावर पांढऱ्या उभ्या लाईन आहेत. तर काळ्या रंगाची पँट असा पोषाख असून पायात काळ्या रंगाची चप्पल आहे.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून वरील वर्णनावरून ओळख पटत असेल तरी संबधीत नागरिकांनी चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.