Indrayani River : इंद्रायणी नदीमध्ये बुडणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे अग्निशमन दलासह स्थानिकांनी वाचवले प्राण

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी नदीतील (Indrayani River) पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज दि.12 ऑगस्ट रोजी इंद्रायणी नदीतील गरुड स्तंभाच्या पुलाजवळ असणाऱ्या बंधाऱ्या लगत तसेच इंद्रायणी नगर हवेली भागाजवळील नदीपात्रामध्ये असणाऱ्या जलपर्णीच्या थरावर एक वृद्ध व्यक्ती मधोमध भंगाराचे सामान (प्लास्टिक बाटल्या) गोळा करत असताना तिचा पाय जलपर्णीत अडकला. ती व्यक्ती इंद्रायणी नदीत बुडत होती.

त्याचे वृत्त नगरसेवक सचिन गिलबिले यांनी आळंदी अग्निशमन विभागाला दिले. अग्निशमन दलाने त्याची  माहिती पोलीस विभागाला ही कळवली.

तत्काळ अग्निशमन दल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून स्थानिक नागरिकांच्या मदतीसह त्या बुडणाऱ्या व्यक्तीस नदीपात्रातील (Indrayani River) पाण्यातून बाहेर काढले. त्या वृद्ध व्यक्तीस वाचवणारे आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल विभागाचे ड्रायव्हर विनायक सोळंके, फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन पद्माकर शिरामे, आरोग्य विभागाचे हनुमंत लोखंडे व पोलीस शिपाई गणेश कटारे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी इंद्रायणी नगर रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. याविषयाची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने दिली.
https://youtu.be/y0uANT2Fsp4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.