Maval : मावळातील वारंगवाडी येथे डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून

एमपीसी न्यूज : मावळातील वारंगवाडी येथील संगमेश्वर महादेव मंदिराजवळ (Maval) गवतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.10) सायंकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी रामदास विठ्ठल धुमाळ (वय 36, वारंगवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : साडेचार वर्षात 15 खून ‘अनडिटेक्ट’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेची ओळख पटली (Maval) नसून तिचे अंदाजे वय 75 ते 80 असावे. तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मात्र, आरोपी मयत किंवा खुनाचे कारण याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.