Maval : खासगी शिक्षक महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी आनंद गावडे

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी आनंद गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली.

डॉ. बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू व मदत कार्य पथकाचे सचिव म्हणून मागील काही वर्षांपासून आनंद गावडे कार्यरत आहेत. शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास करतानाच सामाजिक कार्याची आवड जोपासताना शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू संस्थेच्या माध्यमातून लोणावळ, मावळ व राज्यातील विविध भागांमध्ये आनंद गावडे व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कार्य करत शेकडो जणांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत सदरची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.