Pimpri News : ‘टाटा मोटर्स’ सारखा अप्रतिम प्लांट मी आजपर्यंत पाहिला नाही – आनंद इंगळे

एमपीसी न्यूज – ‘टाटा मोटर्स’ या कंपनी बद्दल मला कायम रिस्पेक्टच वाटतो. काही लोक एक घर चालवू शकत नाहीत. टाटा हजारो लोकांना बरोबर घेऊन ही कंपनी चालवत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. इतका अप्रतिम प्लांट मी आजपर्यंत पहिला नाही. प्रत्येकजण आपले काम करत आहे. कुठलाही गोंधळ नाही. तसेच कामगारांना कंपनीबद्दल आत्मीयता आहे, ही बाब टाटा कंपनीचे यश सांगून जाते, असे मत नाट्य सिनेकलाकार आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.

टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’ या 41 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नाट्य सिनेकलाकार आनंद इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी ऑपरेशन हेड अजॉय लाल, प्लांट हेड अलोक सिंग, सरफराज मणेर, अशोक माने, संतोष दळवी, अशोक कुमार सिंग, कलासागरचे प्रेसिडेंट सुनील सवाई, मकरंद गांगल, रोहित सरोज आदी मंचावर उपस्थित होते.

संजय चांदगुडे यांनी आनंद इंगळे यांच्याशी मुलाखतरूपी संवाद साधला. अनेक विषयांवर बोलताना इंगळे म्हणाले, कोरोना काळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली. काळाच्या ओघात ही मंडळी फार उपेक्षित राहिली आहे. त्यांचा मला अभिमान आहे. हवं ते मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हवं तेंव्हा नाही म्हणता येणं हा आहे. आपलं पूर्ण झालं आहे असं वाटायला लागलं म्हणजे आपण थांबलो आहोत, असं समजावं. मी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यात मी दिसायचं काम केलं, दाखवायचं काम विक्रम गायकवाड या मेकअप आर्टिस्टने केलं आहे.

पुणेकर असल्याचा आनंद वाटतो. पुणेरी पाट्यांमध्ये खूप चांगला ह्युमर आहे. चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी वेगळी नजर, वेगळी बुद्धी लागते. ती प्रोसेस माझी सुरू आहे. चित्रपट, नाटक दिग्दर्शित करावं वाटतं. मी ठरवले तरी नाट्यक्षेत्र सोडून गाडी बनवू शकत नाही. कलासागरचे सर्व साहित्यिक मात्र टाटा मोटर्समध्ये काम करून लिहितात, ही कौतुकाची बाब आहे.

टाटाच्या कलासागर दिवाळी अंकाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मला याचा अभिमान वाटतो. कुठल्याही पद्धतीच कौतुक हे चांगलंच आहे. पण कौतुकाने हुरळून जाऊ नका. कालच्या पेक्षा आज चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जे लिहाल ते सोशल मिडियापासून लांब ठेवा. सोशल मिडिया हे खोटं जग आहे. त्यावर काही पाहिलं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, असा सल्ला देखील आनंद इंगळे यांनी दिला.

20 ऑगस्टला कलासागरने 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. नाट्य, साहित्य, संगीत, कला क्षेत्रात कलासागरने चांगले काम केले. कोरोना काळात कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोरल वाढविण्यासाठी कलासागरने प्रयत्न यशस्वी केले आहेत.

अलोक कुमार सिंग यांनी कलासागरच्या 50 वर्षांच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात लोकांना जोडण्याचे काम कलासागरने केले आहे. टाटाच्या संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलासागर महत्वाची भूमिका बजावतो. दरम्यान, 1972 मध्ये कलासागरची सुरुवात झाली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना कंपनीसोबत जोडून ठेवण्याचे काम कलासागर करत असल्याचे गौरवोद्गार अजॉय लाल यांनी काढले.

46 व्या कथा कविता स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. त्यात इंग्रजी लेख – सूचित पांडे, दीप्ती नाईक, इंग्रजी कविता – सई कुलकर्णी, वैशाली नाईक, दीपा मैत्री, अभिषेक मिटके, हिंदी कविता विनोद राठोड, विक्रम सोनवणे, दिग्विजय खंडाईत, कल्पना येळगावकर, आदित्य जैन, ऋचा मोहबे, हिंदी कथा विष्णू नाईक, विशेष लेखन – सलोनी सिन्हा, नंदकिशोर हुरसाड, सरला पाटील, राजेश हजारे, सीमा गांधी, शांताराम वाघ, स्वर्णगौरी मुणगेकर, कल्पना येळगावकर, अश्विनी विभूते, आरती येवले, अनघा काशीकर, तृप्ती नटराज, मनोजकुमार मोरे, प्रदीप बगाडे, सोनाली मोघे, ऋचा मोहबे, कमल सोनजे, सुदर्शन आहेर, सिया सामंत, कस्तुरी पोतदार, शीतल परब, राहुल बोर्डे, विठ्ठल भोर, पायल सिन्हा, राजू नटराज यांना बक्षीस मिळाले आहे.

मराठी कवितेसाठी आदित्य रसाळ, सुहासिनी येवलेकर, अर्चना पदकी, हेमंत अणावकर, सीमा गांधी, अनिता उन्हाळे, ऋषीकेश काळे, राजगोंडा पाटील, मराठी लेख – प्रदीप वाघ, सविता इंगळे, अभिजित उभे, नितीन चव्हाण यांना बक्षीस मिळाले. तर, मराठी ललित लेखन – हेमंत अणावकर, क्षितिजा चव्हाण देसाई, मानसी चिटणीस, सीमा गांधी, पूजा सामंत, ऋषीकेश काळे, मराठी कथा – अंबिका परदेशी, जयश्री श्रीखंडे, ज्ञानेश रहाणे, अनिता उन्हाळे, चेतन गवळी, केतकी मंडपे, बाल लेखक – ओम रसाळ, नेहा केळकर, त्रिना उर्फ शौमित्रि मुजुमदार, सलोनी सिन्हा, आर्य येळगावकर, अनुष्का चिटणीस यांना बक्षीस मिळाले.

वीरेंद्र वायाळ यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. एच आर हेड सरफराज मणेर, टाटा मोटर्स एम्प्लॉयी युनियनचे जनरल सेक्रेटरी संतोष दळवी आदींनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.