Chinchwad News : नवीन वर्षा निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विदयालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवीन वर्षा निमित्त (Chinchwad News) आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.हा आनंद मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांन बरोबरच पालकांनीही मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली.

विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष  सुभाष देवकाते सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली विद्यालयात आनंद मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला. आनंद मेळाव्याची सुरुवात प्रमुख अतिथी बाळासाहेब देवकाते सर (संचालक -यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ ), डॉ. तुषार देवकाते (सचिव -यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ )यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन व रिबन कट करून करण्यात आले. प्रमुख अतिथीनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Pune Police : पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 6 जानेवारी रोजी

विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्या मध्ये छान खाऊची दुकाने लावली होती. यामध्ये भेळ, इडली, पाणीपुरी, मसाला दुध, पोहे….. इत्यादी पदार्थांचे स्टॅाल्स लावण्यात आले होते. प्रत्येकाने आपली दुकानं छान सजवली होती. सुंदर दुकानाच्या नावाची पाटी तयार करून लावली होती. (Chinchwad News) विद्यार्थ्यांची तयारी व उत्साह पाहता आनंद मेळावा आयोजित करण्या मागील उद्देश विद्यार्थ्यांन मध्ये व्यवस्थापन कौशल्य व व्यवहार ज्ञान विकसित करणे हे सार्थक झाल्या सारखे वाटले. मुलांनी सुंदर तयारी केली होती.विद्यार्थ्यांन बरोबरच पालकांनीही मोठया संख्येने उपस्थिती आनंद मेळाव्यास दर्शवली होती. सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.