Vadgaon Maval News : वडगाव शहर भाजपच्या अध्यक्षपदी अनंता कुडे

भाजप वडगाव शहर नूतन कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी वडगाव शहराची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये अनंता कुडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, वडगांव शहर निरीक्षक प्रभारी माजी उपसभापती शांताराम कदम, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तालुका विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मावळते अध्यक्ष किरण भिलारे, सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

यावेळी माजी सभापती विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, ज्येष्ठ नेते ॲड. तुकाराम काटे, माजी ग्रामपंचायत सदस्य बंडोपंत भेगडे, नारायण ढोरे, गोपाळ भिलारे, वसंत भिलारे, नगरसेवक प्रविण चव्हाण, ॲड. विजय जाधव, गटनेते दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, शामराव ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, मावळ तालुका क्रीडा मोर्चा अध्यक्ष नामदेव वारींगे, मावळ भाजयुमो सरचिटणीस रविंद्र काकडे, मनोज बाफना, रमेश ढोरे, शेखर वहिले,  संदिप म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर, योगेश म्हाळसकर, विकी म्हाळसकर, भूषण मुथा, संतोष भालेराव, विनय भालेराव आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांकडून कार्यकारिणीला शुभेच्छा देत भविष्यात वडगाव शहर भारतीय जनता पार्टीची वाटचाल  समाजातील तळागाळातील नागरिकांना न्याय देत, सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन सर्वसमावेशक अशा पद्धतीने असेल अशी ग्वाही देण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले अनंता कुडे यांनी पक्षाचे सरचिटणीस, प्रसिध्दीप्रमुख म्हणून काम केले असून ते ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. आगामी काळात शहरातील संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागत रमेश ढोरे यांनी केले. सूत्रसंचालन रविंद्र म्हाळसकर यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष अनंता कुडे यांनी आभार मानले.

वडगाव भाजपची नवीन कार्यकारिणी –

अध्यक्ष – अनंता बाळासाहेब कुडे

युवा मोर्चा अध्यक्ष – विनायक रामभाऊ भेगडे

विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष – प्रज्योत मारुती म्हाळसकर

अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष – दिपक नारायण भालेराव

व्यापारी मोर्चा अध्यक्ष – चेतन मोतीलाल बाफना

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.