Pimpri : …अन् महापालिका आयुक्तांनी दिली चुकीची कबुली

एमपीसी न्यूज – राडारोड्याच्या विषयावरुन सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर हल्लाबोल चढविला. प्रशासनाच्या चुकीचा कारभाराचा भांडाफोड केल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दोनवेळा खुलासा करावा लागला.  दुस-या वेळी खुलासा करताना धोरण मंजूर केल्यानंतरच निविदा काढायला हवी होती, अशी स्पष्ट कबुली आयुक्तांनी दिली.

राडारोड्याच्या विषयावरून सत्ताधारी भाजप नगरसेवकच आक्रमक झाले होते. त्यामुळे दोनदा खुलासा करण्याची वेळ आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर आली. महासभा व स्थायी समितीच्या मंजुरीनंतरच राडारोडा विघटन प्रक्रिया व पुर्नवापर प्रकल्पाची निविदा काढण्यात आली होती, असा सूर धरणाऱ्या आयुक्तांनी दुसऱ्यांदा खुलासा करताना पलटी मारली. धोरण मंजूर केल्यानंतरच निविदा काढायला हवी होती, अशी कबुली त्यांनी दिली.

परंतु, निविदा प्रक्रिया आधी केल्यामुळेच शूल्क निश्चितीबाबतचे धोरण ठरविणे सोपे झाले, असे सांगत आयुक्तांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. गटनेत्यांना विश्वासात न घेता धोरण महासभेसमोर आले असेल. तर, कार्यकारी अभियंत्यांना समज देतो, असे सांगत आयुक्तांनी हा विषय संजय कुलकर्णी यांच्यावरच शेकविण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.