Pune : …अन् मूषक ऐवजी बाप्पा निघाले कारमधून

पुण्यातील डॉक्टरांनी रिमोटवरील कारमधून काढली बाप्पांची मिरवणूक

एमपीसी न्यूज – सगळेच जण आधुनिक झालेत मग बाप्पा कसे मागे राहणार. यंदाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी बाप्पांना चक्क कारमधून जाताना पाहिले. कारमधील बाप्पांनी सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले होते. पुण्यातील कुमठेकर रोडवरील एका डॉक्कटरांनी खेळण्यातल्या रिमोटवर चालणा-या कारमधून बाप्पांची मिरवणूक काढली. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली होती. 

डॉ मिलिंद संपगावकर, असे या डॉक्टरांचे नाव. याबद्दल बोलताना डॉ. मिलिंद यांनी सांगितले की माझा सहा महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे हातांमध्ये गणपती बप्पाची मूर्ती घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीत मुलीच्या छोट्या गाडीमध्ये बप्पाला घेऊन जात आहे. अपघातामुळे हा निर्णय घेतला असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे नेहमी इलेक्ट्रॉनिक वाहनाचा किंवा वस्तूंचा वापर करण्यासाठी आग्रही असतात. यामुळे त्यांच्या आवाहनालाही प्रतिसाद देता आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.