Chinchwad News : … आणि आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळले

एमपीसी न्यूज – एका मुलीने आपल्या वडिलांच्या विरहात स्वतः केलेली ‘देवा घरचा बाबा’ ही कविता (poem)  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Police commissioner Krishna Prakash) यांच्या समोर सादर केली आणि ‘आयर्नमॅन’ (Iornman) अशी ओळख असलेल्या आयुक्तांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहिल्या ( burst into tears)

ऋतुजा शांतीलाल पाटील (रा. पळशी, ता. माण, जि. सातारा) असे कविता सादर केलेल्या मुलीचे नाव आहे.

ऋतुजा लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिला आयुष्यात आलेल्या अनुभवांची मांडणी ‘झुळूक'( Zuluk) या पुस्तकात तिने केली आहे. तिने हे पुस्तक कृष्ण प्रकाश यांना भेट दिले.

त्यावेळी तिने ‘देवा घरचा बाबा’ या कवितेतून आपल्या भावनांना वाट करून दिली. ऋतुजाची कविता ऐकताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.