Technology News : …आणि फेसबूक वापरकर्ता झाला आपोआप ‘लॉग आऊट’

एमपीसी न्यूज : फेसबुक ॲपवरून ‘लॉग आऊट’ केले नसतानाही बरेच वापरकर्ते ॲपमधून आपोआप लॉग आऊट झाल्याचा प्रकार 22 जानेवारीस घडला. यामुळे वापरकर्यांनी समाजमाध्यमांवर याबद्दल फेसबुकला विचारणा केली होती. शनिवारी फेसबुकने त्याबाबतचे स्पष्टीकरण देऊन याचा खुलासा केला आहे.

ॲड्रॉईड व ॲपल प्रणालींवर फेसबुक ॲप वापरणा-या ग्राहकांना दोन दिवसांपूर्वी ॲप उघडल्यावर ‘साईन ईन’ करा हे सांगण्यात आले. पण आम्ही ‘साईन आऊट’ केलेच नव्ह्ते तरी आम्हाला पुन्हा ‘साईन इन’ करा, असे कसे काय सांगण्यात आले. इतकच नव्हे तर पुन्हा ‘लॉग इन’ करण्याचा प्रयत्न केला असता, ‘लॉग इन’ व्हायलादेखील बराच वेळ फेसबुककडून घेतला जात होता, लॉग इन झाले तर न्यूज फीड दिसत नव्हते, अशा तक्रारी वापरकर्त्यांनी समाजमाध्यमांवर मांडल्या आहेत.

फेसबुकने याबाबतचा खुलासा करताना म्हणले आहे, कॉन्फिगरेशनमध्ये काही बदल झाल्यामुळे ही समस्या आली. ही समस्या सहनशक्ती दाखवून सोडवल्याबद्दल आणि आम्हाला ती समजावून सांगणा-या इंजिनिअर्ससाठी टाळ्या, असे ट्विट त्यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आयओएस प्रणाली वापरणा-या वापरकर्त्यांना ही समस्या जास्त आल्याचे पुढे आले आहे. ही समस्या फक्त मोबाईल ॲपला आली असून वापरकर्ते संगणकासारख्या माध्यमावर फेसबुक वापरू शकत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.