Film Muhurt: ‘आणि ती सहा पत्रं’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

"Ani Ti Saha Patra" moive's muhurta was held recently.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू देश अनलॉक कडे वाटचाल करत आहे. यातच चित्रपटश्रुष्टी देखील हळू हळू पूर्वपदावर येताना दिसत आहे, अनेक मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. गेल्या अनेक वर्षात मराठी चित्रपटाच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. या रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण चित्रपटांची प्रभावी निर्मिती सातत्याने होत असताना दिसत आहे. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित “आणि ती सहा पत्रं” या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार आकाश फुंडकर उपस्थित होते. 

ताहिरनक्काश मणेर, निलेश पांडे आणि स्वप्नील वेंगुर्लेकर हे या चित्रपटाची निर्मित करत असून कथा आणि दिग्दर्शन देवश्री कस्तुरे यांचे आहे तर कॅमेराची जबाबदारी वसीमबार्री मणेर सांभाळत आहेत.

चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर असून ती सहा मित्र आणि एका स्त्री इन्वेस्टीगेशन ऑफिसर यांच्याभोवती फिरते, चित्रपटात अनेक नामवंत कलाकार भूमिका साकारणार असून लवकरच त्याचं पोस्टर अनावरण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शन देवश्री कस्तुरे म्हणाल्या की, मराठीमध्ये प्रथमच या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक नवीन प्रयोग रसिकांना पाहायला मिळणार असून, अतिशय वेगवान कथानक असणारा हा चित्रपट नक्कीच रसिकांना आवडेल असा विश्वास वाटतो असं त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.