Lions Club Akurdi : लायन्स क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी अनिल भांगडिया तर सचिवपदी बालाजी सुरवसे

एमपीसी न्यूज –  लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डीच्या (Lions Club Akurdi) अध्यक्षपदी अनिल भांगडीया तर सचिवपदी बालाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली. तसेच, लिओ क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी हर्षित शर्मा तर सचिवपदी यश महाजन यांची निवड करण्यात आली.

थरमॅक्स चौकातील हॉटेल वी येथे अनिल भांगडीया व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण समारंभ पार पडला. ह्या सोहळ्यामध्ये नवीन 58 सभासद जोडले असून पुढेही असेच नवीन सभासद वाढवत राहणार आहोत असे भांगडिया म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्किटेक्ट मनाली भांगडिया आणि नवनिर्वाचित अध्यक्ष यांची ओळख अपूर्वा भांगडिया यांनी करून दिली.

Mahesh Landge : आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकाटी बाळगावी

यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ दीपक शहा, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल-1 परमानंद शर्मा, वसंत गुजर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, अर्बन स्पेस क्रिएटरचे संचालक मोहित डागा, वास्तुविशारद  स्वप्नील शेठ, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टाणी, वि हॉटेल चे संचालक संजय ढेंबरे आणि नामदेव पोटे, पिंपरी चिंचवड फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे, मावळते अध्यक्ष विक्रम माने, मावळते सचिव अक्षय शहरकर , माजी खजिनदार अर्चना कोळी, लिओ क्लबचे माजी अध्यक्ष श्वेता माने, खजिनदार दर्शिता सुरवसे,  तसेच सामाजिक, कला, क्रीडा, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील आदी उपस्थित होते.

अध्यक्ष अनिल भांगडिया भविष्यातील (Lions Club Akurdi) उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले की, ”लायन्स क्लब आकुर्डी आणि अर्बन स्पेस क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने फिनोलेक्स चौक पिंपरी आणि रावेत येथील मुकाई चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी मॅडम आणि नेहा मुंदडा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.