Anil Deshmukh : वर्षभराने अनिल देशमुख तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस (Anil Deshmukh) पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप होते. जवळजवळ एक वर्षाने त्यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी जामीन आदेशाला स्थगिती देण्यास सीबीआयला नकार दिल्यानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

Pimpri : अटकवून ठेवलेली वाहने नेण्याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

अनिल देशमुख यांच्या सुटकेने राष्ट्रवादीतील (Anil Deshmukh) कार्यकर्ते अत्यंत खुश असून त्यांची रॅली काढण्यात आली आहे. मोठ्या जल्लोषात त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देशमुख बुधवारी कारागृहाबाहेर आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.