Pimpri : आचारसंहितेच्या धास्तीने उद्‌घाटन, भूमिपूजनाचा धडाका

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्या विविध विकास कामांची उद्‌घाटने

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्ती आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उद्‌घाटने आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. भाजपने उद्या (गुरुवारी) विविध विकास कामांची उद्‌घाटने, भूमिपूजन ठेवली आहेत. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्या उद्घाटने होणार आहेत.

प्रा .रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडेदहा वाजता शिक्षक दिनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्घाटन आणि भूमिपूजनांच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक 18 येथील अमृत योजनेतील ऑक्सीजन उद्यानाचे उद्घाटन, सव्वाबारा वाजता मंगलमूर्तीवाडा चापेकर बंधू शिल्पसमूह ते थेरगाव बोटक्लब परिसराचे सुशोभिकरणाचा शुभारंभ, साडेबारा वाजता मोरया गोसावी मंदिर चिंचवड, प्रभाग क्रमांक 17 बिजलीनगर मधील राजर्षी शाहू महाराज उद्यानाचे लोकार्पण, पावणे एक वाजता  पिंपरीगावातील जिजामाता हॉस्पिटल नवीन इमारतीचे उद्घाटन,  दुपारी एक वाजता शहिद हेमू कलानी पुतळ परिसरातील सुशोभिकरणाचे उद्घाटन, दुपारी सव्वाएक वाजता पिंपरी वाघेरे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहासनस्थ पुतळा उभारणे व त्या अनुषंगिक कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दुपारी दीड वाजता पिंपरी वाघेरे येथील भैरवनाथ मंदिर येथील बहूउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन, दुपारी पावणे दोन वाजता डांगेचौक थेरगाव येथील अंडरपासचे भूमिपूजन, दोन वाजता रहाटणी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस बससेवेचा शुभारंभ, सव्वादोन वाजता रहाटणी येथील मनपा शाळा ते पिंपळे सौदागर स्माशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी काँक्रिटीकरणाचा शुभारंभ, अडीच वाजता दापोडी येथील सीएमई गेट समोरच्या सबवेचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, भोसरी मतदारसंघातील विविध विकास कामांचे रविवारी उद्घाटने आणि भूमिपूजन करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like