Pimpri : विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अण्णा बनसोडे यांनी घेतल्या गाठीभेटी

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शहरात मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदारांशी संपर्क साधला.

_MPC_DIR_MPU_II

अण्णा बनसोडे यांनी काल (सोमवारी) ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे, माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, दिनकर दातीर पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक दिगंबरशेठ काळभोर, संतोष कुदळे, प्रसाद शेट्टी, निलेश पांढारकर, काळूराम पवार, उद्योजक किर्ती शहा, व्यंकटेश देवगीरीकर, दादा नाईक, चतूर पांढारकर, निलेश शिंदे, बाळासाहेब ठाणगे, राजू कोहली, भरत सोळंकी, दीपक चोप्रा आदींच्या भेटीगाठी घेतल्या.

दरम्यान, आज विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून माजी आमदार बनसोडे यांनी शहरात मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदारांशी संपर्क साधून त्यांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राधिकरण आकुर्डी येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या शांती मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. यावेळी प्रताप सोनवणे, हिरामण रामटेके, दत्तात्रय मिसाळ, मंगला मुनेश्वर, निर्मला वालकर, रंजना निमगडे, इंदूमती वाघमारे, रंजना निमगरे, गुणवंत रामटेके, बाळासाहेब कांबळे, सुनील तायडे, यशवंत भालेराव, संजय शिंदे, उत्तम गायकवाड, गौतम जाधव, कश्यप ठमके, अर्जुन सावंत, अजय जगताप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.