Anna Hazare admitted : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छातीत दुखत असल्यामुळे अण्णा हजारे यांना रुबी हाॅल क्लिनिक येथे भरती करण्यात आले. तेथे त्यांची एनजिओग्राफी करण्यात आली, इतर तपासण्या सुद्धा करण्यात आल्या. एनजिओग्राफी दरम्यान अण्णांच्या हृदयात छोटं ब्लाॅकेज आढळून आले.

मात्र, या ब्लाॅकेज वर शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे. औषधाच्या साहाय्याने हे बरं करता येऊ शकेल असे रुग्णालयाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांची प्रकृती ठिक असून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधिक्षक डाॅ अवधूत बोडमवाड यांनी सांगितले आहे.

पाहा सविस्तर वृत्त –

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.