Anna Hazare : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांचे जानेवारीत आंदोलन

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अण्णा हजारे येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत आपल्या आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी परवानगी मागितली आहे.

अण्णा हजारे यांनी लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना खर्चावर आधारित 50 ट्क्के अधिक दर मिळाला तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

तसंच धान्य, भाज्या, फळ, दूध, इ. सर्वच उत्पादनांची किमान आधारभूत किंमत ठरवणं गरजेचे आहे, असंही हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राज्य कृषी खर्च व मूल्य आयोगाने ठरवलेल्या किमतींमध्ये केंद्र सरकारने घट करू नये, अशी मागणीही अण्णांनी केली आहे. त्यासाठी कृषी मूल्य आयोगाचा कारभार स्वतंत्रपणे चालावा असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.