Annabhau Sathe Jayanti : अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवामुळे जेधे चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज –  पुण्यातील जेधे चौकातील वाहतुकीत 1 ऑगस्ट रोजी सकाळी सातपासून एक दिवसासाठी बदल करण्यात येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती निमित्त (Annabhau Sathe Jayanti) चौकात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमामुळे हा बदल करणार असल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार,

मार्ग क्रमांक 1 – जेधे चौकातून सारसबागकडे जाणार रस्ता बंद करण्यात येणार असून, जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौक मित्रमंडळ चौक सावरकर चौक मार्गे  सिंहगड रोडला जावे, सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी सावरकर चौकाकडून मित्रमंडळ चौकातून व्होल्गा चौकाकडे पुढे जेधे चौकाकडे जावे,

मार्ग 2 –  जेधे चौकातील वाय जंक्शन वरून सारसबागकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून कात्रज सारसबागेकडे जाणाऱ्या ब्रीजवरून न जाता लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून  जावे.

मार्ग 3 – वेगासेंटर ते सारसबागपर्यंत ग्रेडसेपरटरमधून वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे वेगासेंटरपासून घोरपडी पेठ उद्यान राष्ट्रभुषण चौकपासून हिराबाग चौकाक़ून इच्छित स्थळी जावे.

मार्ग 4 – पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहतांना आवश्यकते दुपारी तीन ते मध्यरात्री बारापर्यंत शिथीलता असणार आहे.

हा बदल 1 ऑगस्टपासून सकाळी सातपासून गर्दी कमी होईपर्यंत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.