Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कनिष्का शिंदे या विद्यार्थीनीने सुविचार प्रस्तुत केला.  कुमारी चाँदनी खान या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करून सावित्रीबाई फुले यांचा  जीवन पैलूंचा परिचय करून दिला.

सिद्धि ढोरे या विद्यार्थिनीने महिला सशक्तिकरण यावर आपले भाष्य केले. तसेच आर्या म्हामुनकर व आदिती ढोरे या विद्यार्थिनीने आजच्या युगातील महिला व स्त्री- पुरुष समानतेवर काही घोषवाक्य सादर करून सर्वांची मने वेधून घेतली, कुमारी सायबा खान या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित एक ओवी सादर केली.

शालेय व्यवस्थापना तर्फे दीपिका परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील आदर्श मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे.  विद्यालयातील शिक्षक सिद्धेश्वर सोनवणे, दिव्या चॕटर्जी यांनीदेखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि अर्चना आठवले य़ांनी स्वरचित कविता प्रस्तुत केली.

मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की सावित्रीबाईंनी सांगितल्यानुसार समाजातील अज्ञान हा आपला खरा शत्रू आहे त्याला आपल्या जीवनातून काढल्याशिवाय मानवाची प्रगती नाही हे खरे आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नरत राहूयात.

या कार्यक्रमास पहिली ते आठवीचे विद्यार्थी ऑनलाईन   तर ९ व १० चे  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अध्यापक वृंद व विद्यार्थी यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ज्योती चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी केले.

या सुवर्णक्षणाच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी शाळेने सर्व विद्यार्थ्यांकडून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित तसेच महिला सशक्तिकरण या विषयांवर  चित्रकला,कविता भाषण, घोषवाक्य तयार करणे, भेटकार्ड बनवणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यांस सर्व विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त  प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.